बांधकाम व्यावसायिकांनी नेतृत्व गुण विकसित करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:11+5:302021-02-05T05:37:11+5:30

नाशिक : समाजात बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करताना नेतृत्व करण्याचा गुण आवश्यक असून यासाठी कायमच शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ...

Builders need to develop leadership qualities | बांधकाम व्यावसायिकांनी नेतृत्व गुण विकसित करण्याची गरज

बांधकाम व्यावसायिकांनी नेतृत्व गुण विकसित करण्याची गरज

नाशिक : समाजात बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करताना नेतृत्व करण्याचा गुण आवश्यक असून यासाठी कायमच शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा असे मत क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष आणि मगरपट्टा टाऊनशिपचे डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी व्यक्त केले.

क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय क्रेडाई राष्ट्रीय शिखर परिषद २०२१ चे शुक्रवारी (दि.२९) नाशिक येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मगर बाेलत होते. यावेळी व्यासपीठावर क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल, रुस्तमजी ग्रुपचे बोमन ईरानी, राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख, सुरेश पाटील, उमेश वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी परिश्रमांबरोबरच उत्तम प्रकारे नियोजन हवे, कामाचा फोकस हवा, याशिवाय एकमेकांना सहकार्य करणेही आवश्यक आहे, असे सांगून आगामी काळात खूप मोठे आव्हाने उभी आहेत. यात आर्थिक नियोजनाबरोबरच कोरोनासारखे अतिशय वेगळे आणि गंभीर संकट देखील आहे. याचा स्वतंत्रपणे विचार करून नियोजन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

यानंतर झालेल्या कार्यक्रमात निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी बांधकाम व्यवसाय हा पुढे आव्हानात्मक होणार आहे, असे सांगितले.यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी क्रेडाई महाराष्ट्राने वर्षभर केलेल्या कामांचा आढावा सादर केला.यावेळी गौरव ठक्कर, अनिल आहेर, सागर शहा, विजय चव्हाणके, कुणाल पाटील, सचिन बागड, राजेश आहेर, नरेंद्र कुलकर्णी, अतुल शिंदे, अनंत ठाकरे, हंसराज देशमुख आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. शनिवारी (दि.३०) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार आहे.

फोटो ओळी आर फाेटोवर ३० : क्रेडाई शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, समवेत शांतीलाल कटारिया,सुनील कोतवाल, बोमन ईरानी, जितेंद्र ठक्कर, अनंत राजेगावकर व राजीव पारीख.

Web Title: Builders need to develop leadership qualities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.