मनपा निवडणुकांसाठी आपची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:02+5:302021-08-20T04:19:02+5:30

आम आदमी पार्टीच्या राज्य कमिटीने आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषद घेत ...

Build your front for municipal elections | मनपा निवडणुकांसाठी आपची मोर्चेबांधणी

मनपा निवडणुकांसाठी आपची मोर्चेबांधणी

आम आदमी पार्टीच्या राज्य कमिटीने आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषद घेत आप आगामी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. आम आदमी पक्षाला गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये विशेष प्रयत्न न करताही मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्ष या निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकद लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सद्य:स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासाच्या कामांसाठी ५० ते ७५ टक्के अतिरिक्त खर्च होत असून नाशिकमध्येही हीच परिस्थिती असल्याचा आरोप ‘आप’च्या पदाधिकाऱ्यानी केला. या खर्चात बचत करून नागरिकांना अल्पदरात उत्तम सेवा देणे शक्य असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यध्यक्षपदाची धुरा जितेंद्र भावे यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांच्याच नेतृत्वात आगामी मनपा निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे राज्य कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Build your front for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.