विजेचा धक्का लागून म्हैस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:25 IST2020-08-16T22:25:59+5:302020-08-17T00:25:43+5:30
पेठ : तालुक्यातील पेठ शहरानजीकच्या हट्टीपाडा येथे विजेच्या खांबानजीक ताण दिलेल्या वीजवाहिनीला धक्का लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्का लागून म्हैस ठार
ठळक मुद्देदुभती म्हैस वीजवाहिनीत प्रवाह उतरल्याने त्या दिशेने खेचली जाऊन जागीच ठार झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील पेठ शहरानजीकच्या हट्टीपाडा येथे विजेच्या खांबानजीक ताण दिलेल्या वीजवाहिनीला धक्का लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाला.
उत्तम गंगाराम दिघे यांची दुभती म्हैस वीजवाहिनीत प्रवाह उतरल्याने त्या दिशेने खेचली जाऊन जागीच ठार झाली. ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर विद्युत मंडळास कळवून विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. तलाठी यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. विद्युत मंडळाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दूध विक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणारे दिघे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.