शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

नाशिकच्या कुंभमेळ्याला अर्थसंकल्पात ठेंगा! कोणतीही तरतूद नाही, निओ मेट्रोही वाऱ्यावरच

By संजय पाठक | Updated: February 2, 2025 14:43 IST

Budget 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे कौतुक होत असताना दोन वर्षांवर आलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्रशासनाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- संजय पाठक नाशिक - प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे कौतुक होत असताना दोन वर्षांवर आलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्रशासनाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या निओ मेट्रासाठी देखील अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्याने मेट्रोला पुन्हा ब्रेक लागल्याचे दिसत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (दि.१) अर्थसंकल्प सादर केला. त्यात कुंभमेळा किंवा नाशिकसाठी काेणती तरतूद नसल्याचे दिसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दोन वर्षानंतर म्हणजेच २०२६-२७ या वर्षात कुंभमेळा हेाणार आहे. राज्यशासनाने नियुक्त केलेल्या समित्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्यस्तरावर जोरदार तयारी सुरू आहे. कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे १२ कोटी रूपयांचा आहे. या आराखड्यात मुळातच अनेकदा छाटणी करण्यात आली आहे. शासनावर आर्थिक ताण नको म्हणून आराखड्यातील अनेक कामे वगळली जात असली तरी दुसरीकडे मात्र, दीर्घकालीन पण स्थायी कामे हेाणार नसतील तर काय उपयोग असा प्रश्न केल जात आहे.

नाशिकच्या कुंभमेळ्यातील पायाभूत सुविधांचा आराखडा अद्याप तयार नाही. मात्र, निओ मेट्रो, दक्षीण गंगा गोदावरी नदीचे शुध्दीकरण यासाठी केंद्रशासनाला अर्थसंकल्पात तरतूद करणे शक्य होते मात्र, तरी करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019NashikनाशिकKumbh Melaकुंभ मेळा