शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बोधीवृक्षाच्या पानांवर बुद्ध रेखाटणारा कलावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:41 IST

एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय उपनगरमधील अरुण जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यावर येतो. कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२ वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार.

नाशिक : एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय उपनगरमधील अरुण जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यावर येतो. कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२ वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार.  तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल्या आहेत हे विशेष! गांधीनगर मुद्रणालयातून सेवानिवृत्त झालेले जाधव हे उपनगरमधील दत्तप्रसाद अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी लहानपणीचा मित्र सुरेश सोनवणेकडून कला आणि त्यावर प्रेम कसे करायचे ते शिकले. चित्रकलेचा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम न शिकता केवळ आवड आणि छंद म्हणून जोपासलेल्या कलेद्वारे जाधव हे एखाद्या कला महाविद्यालयाच्या चित्रकारालाही लाजवेल अशा एकापेक्षा एक सरस चित्राकृती रेखाटतात. त्यांच्या चित्राकृती कॅन्व्हासवर अधिक आकर्षक दिसतातच; मात्र त्यापेक्षाही अधिक सुंदर बोधी वृक्षाच्या पर्णावर दिसतात. भगवान गौतम बुद्धांचे विविध भावमुद्रा त्यांनी बोधीवृक्ष अर्थात पिंपळपानावर रेखाटल्या आहेत.बोलक्या चित्राकृतीकॅनव्हासवर चित्र रेखाटणे हे कला महाविद्यालयातून चित्रकलेचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्याला सोपे होते; मात्र कुठल्याही महाविद्यालयात चित्रकलेचे धडे न घेता केवळ एका मित्राची कला बघून तसा प्रयत्न करत आलेल्या अनुभवातून कॅ नव्हासवर नव्हे तर थेट पिंपळाच्या पानावरच चित्र रेखाटण्याचे अद्भुत तंत्र जाधव यांना आत्मसात आहे. पिंपळपानावर त्यांनी रेखाटलेल्या सर्व चित्राकृती जणू संवादच साधतात असाच भास होते. इतक्या बोलक्या आणि आकर्षक रंगसंगतीची जोड असलेल्या या चित्राकृती जिवंत वाटतात.पिंपळपानच त्यांचे कॅनव्हासजाधव यांनी कॅनव्हासवर कुंचल्याचा आविष्कार दाखविण्यास तितकी पसंती दिली नाही जितकी पिंपळाच्या पानाला दिली. या कलाप्रेमी चित्रकाराने पिंपळाचे पान भिजवून ते वाळल्यावर त्यामध्ये हुबेहूब व्यक्तीचित्र रेखाटण्याची वेगळीच कला शिकली आहे. जाळीदार पिंपळाचे पान हे या कलाकाराचे आवडते कॅनव्हास आहे. त्यांनी यामध्ये मेटालिक, अ‍ॅक्रेलिक रंगाचा वापर करत चित्राकृती साकारल्या आहेत.

टॅग्स :Buddha Cavesबौद्ध लेणीNashikनाशिक