राजापूरसह परिसरातील बीएसएनल सेवा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:27 IST2020-07-08T20:30:17+5:302020-07-09T00:27:46+5:30
राजापूर : येथील बीएसएनएल सेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्या-बाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या या वृत्ताची दखल घेत बीएसएनएल कार्यालयाकडून तातडीने काम करून सेवा सुरळीत करण्यात आली आहे.

राजापूरसह परिसरातील बीएसएनल सेवा सुरळीत
राजापूर : येथील बीएसएनएल सेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्या-बाबत लोकमतने प्रसिद्ध
केलेल्या या वृत्ताची दखल घेत बीएसएनएल कार्यालयाकडून तातडीने काम करून सेवा सुरळीत करण्यात आली
आहे. राजापूर येथील बीएसएनएल सेवा गेल्या आठ दिवसांपासून बंद पडलेली होती. यामुळे राजापूर परिसरातील बीएसएनएल ग्राहक त्रस्त झाले होते.
बीएसएनएल कार्यालयाकडे याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती, मात्र ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच यंत्रणा हलली अन्य ग्राहकांना सुरळीत सेवा मिळू लागली. परिसरात कृषी कार्ड ग्राहकांची संख्या मोठी आहे.
----------------------
भ्रमणध्वनी सेवा महिन्यातून बराच वेळा बंद राहत असल्याने ग्राहकांकडून सुरळीत सेवेची मागणी केली जात होती.