‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले
By संजय पाठक | Updated: June 27, 2023 18:13 IST2023-06-27T18:13:11+5:302023-06-27T18:13:59+5:30
नाशिक येथे मंगळवारी एका खासगी कार्यक्रमासाठी आल्यावर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले
नाशिक : ‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नाही, भाजपच्या विरोधात सर्व विरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्यात बीआरएसचा मोठा वाटा असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. नाशिक येथे मंगळवारी एका खासगी कार्यक्रमासाठी आल्यावर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काही केले तरी त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटणार नसून तेलंगणामध्ये देखील त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणे अत्यंत चुकीचे आहे. आंबेडकरी चळवळ हिंदू-मुस्लीम ऐक्याला पाठिंबा देणारी आहे, औरंगजेबाला नाही, असेही ते म्हणाले.