भावाने यकृत देवून वाचविले बहिणीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 00:07 IST2021-07-17T22:56:23+5:302021-07-18T00:07:24+5:30

जोरण : महाराष्ट्रात एक आदर्श गाव म्हणून या गावाची ख्याती असलेल्या बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने आपला आदर्शपणा जपत अनेक वेळा अनेक चांगल्या कामांनी या गावाचा नावलौकिक मिळवला आहे. ही परंपरा सतत ठेवत बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारी घटना किकवारी खुर्द येथे घडले बहिणीचा जीव वाचावा म्हणून भावाने आपले यकृत आजारी बहिणीस दिले.

Brother saves sister's life by paying liver | भावाने यकृत देवून वाचविले बहिणीचे प्राण

भावाने यकृत देवून वाचविले बहिणीचे प्राण

ठळक मुद्देमोठी बहिण सुनिता सावकार हिला यकृत दिल्याने तीचा पुनर्जन्म झाला

तुळशिदास सावकार
जोरण : महाराष्ट्रात एक आदर्श गाव म्हणून या गावाची ख्याती असलेल्या बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने आपला आदर्शपणा जपत अनेक वेळा अनेक चांगल्या कामांनी या गावाचा नावलौकिक मिळवला आहे. ही परंपरा सतत ठेवत बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारी घटना किकवारी खुर्द येथे घडले बहिणीचा जीव वाचावा म्हणून भावाने आपले यकृत आजारी बहिणीस दिले.
धनंजय काकुळते (३५) ३५ याने आपली मोठी बहिण सुनिता सावकार हिला यकृत दिल्याने तीचा पुनर्जन्म झाला आहे. धनंजयची बहीण हिची काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र डॉक्टरांनी तात्काळ मुंबईत हलविण्यास सांगितले. त्यानंतर त्वरित मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांचे यकृत काविळीमुळे निकामी झाल्याचे व त्यांच्या जीवितास धोका असल्याचे सांगितले. यकृतासाठी तात्काळ डोनर मिळणे कठीण झाले होते. यावेळी तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ धनंजय काकुळते याने बहिणीला यकृत दिले. डॉ. प्रशांत राँय यांच्या मार्गदर्शनाखाली ४० तज्ञ सर्जन डॉक्टरांच्या मदतीने सलग १२ तास धनंजय व सुनीता या दोघांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन्ही शस्त्रक्रिया उत्तम रित्या पार पडले असून सुनीता यांच्या जिवीतास धोका टळला आहे. व आता दोघांची प्रकृती स्थिर आहे.

धनंजयला दोन मुली असून एक केवळ दोन महिन्यांची आहे. बहिणीच्या जीवदानासाठी धनंजयच्या या पुढाकारत त्याची पत्नी निलिमा हीने कोणताही विरोध न करता यकृत देण्यास परवानगी दिली. धनंजय काकुळते कुटुंबीयांनी उचललेल्या या खंबीर पावलाबद्दल परिसरात व जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

माझा एकुलता एक भाऊ असल्याने आई वडिलांनी तो नवसाने मागितला आहे. त्याच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्याचा जीव धोक्यात घालणे मला पटत नव्हते, पण मात्र त्याच्या हट्टी स्वभावामुळे त्याने मला त्याचे यकृतदेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझा पुनर्जन्म झाला.
- सुनिता सावकार.

Web Title: Brother saves sister's life by paying liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.