नाशिकच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:50+5:302021-03-13T04:26:50+5:30
नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन २०२१ परीक्षाचा निकाल अवघ्या दहा दिवसात जाहीर ...

नाशिकच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन २०२१ परीक्षाचा निकाल अवघ्या दहा दिवसात जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी धनंजय देशमुख, रितुजित मनोज, समीर देशपांडे आदी विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. दरम्यान, या परीक्षेला प्रविष्ठ होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना अजूनही तीन टप्प्यांमधील परीक्षेचे पर्याय समोर असून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या तारखांनुसार परीक्षाची तारीख निवडता येणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन २०२१ फेब्रुवारी या पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ८) उशीरा जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पहिल्या टप्प्यातील जेईई मेन घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अवघ्या दहा दिवसांमध्ये जाहीर करण्यात आला आहे. देशभरातून ६ लाख २० हजारांच्या जवळपास विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. त्यातील सहा विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत१०० पर्सेंटाइल मिळवून अव्वल आले आहेत. तर नाशिकमधून धनंजय देशमुख ९९.८२, रितुजित मनोज ९९.७६, समीर देशपांडे ९९.७०, सोहम पाटील ९९.५४, तन्मय राणे ९९.४४, प्रसन्न दवंगे ९९.१९ , गौरंग दहाड ९९.१०, संदेश अहिरे ९९.०८ पर्सेंटाईल गुणांसह जेईई मेन फेब्रुवारी २०२१ परीक्षेत लक्षवेधी यश संपादन केले आहे.
कोरोना प्रादुर्भाव विचारात घेता यावर्षी विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी या परिक्षेसाठी मिळावी म्हणून यंदा जेईई मेन परीक्षा चार महिन्यांमध्ये म्हणजेच चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेतली जात आहे. यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात ही परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा वेळापत्रकानुसार सोयीच्या तारखेनुसार परीक्षेचे नियोजन करता येणार आहे. या परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यासाठी अर्ज करून विद्यार्थी परीक्षा देऊन शकणार आहे. . मात्र चारही टप्प्यांमध्ये ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळतील ते गुण अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे फोटो आर फोटोवर उपलब्ध आहेत.