सिन्नर : ‘लेक वाचवा लेक शिकवा’ उपक्रमातंर्गत दापूर जिल्हा परिषद शाळेत प्रभातफेरीतून जनजागृती करण्यात आली. विविध कार्यक्र मांतून जागृती करीत सुमारे १५० विद्यार्थिनींच्या घराच्या दारांवर त्यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या.शाळा समिती अध्यक्ष भाऊसाहेब कांदे, ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, योगेश तोंडे, संजय आव्हाड, सुनील आव्हाड, एस. पी. आव्हाड यांचे विशेष योगदान मिळाले. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे, गायत्री रजपूत, गोरक्ष सोनवणे, मनिषा गोराडे, पल्लवी घुले, कृष्णकांत कदम, नीता वायाळ, सुनंदा कोकाटे, सुनंदा पवळ आदी उपस्थित होते. बालिका दिन, रांगोळी स्पर्धा, आरोग्यविषयक सवयींचे मार्गदर्शन, पालकभेटीतून उपस्थिती टिकवणे, सतत गैरहजर विद्यार्थी प्रवाहात आणणे, मुलीसांठी चमचा-लिंबू स्पर्धा, खाऊचे वाटप, वक्तृत्व स्पर्धा, नाटिकेतून शाळेबद्दल आदर निर्माण करणे, थोर महिलांच्या चरित्र व कार्य सांगणे, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांतून लेक वाचवा अभियानाची जनजागृती शाळेच्या वतीने करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थिनींनच्या घराच्या दारावर त्यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या.
दापूरला विद्यार्थिनींच्या घरावर पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:33 IST
‘लेक वाचवा लेक शिकवा’ उपक्रमातंर्गत दापूर जिल्हा परिषद शाळेत प्रभातफेरीतून जनजागृती करण्यात आली. विविध कार्यक्र मांतून जागृती करीत सुमारे १५० विद्यार्थिनींच्या घराच्या दारांवर त्यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या.
दापूरला विद्यार्थिनींच्या घरावर पाट्या
ठळक मुद्देप्रभातफेरीतून जनजागृती : ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ चा जागर