लेवा समाजातर्फे वधू-वर मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:43 IST2018-11-12T00:43:25+5:302018-11-12T00:43:57+5:30

लेवा समाज कल्याण मंडळाच्या वतीने सकल लेवा समाज वधू-वर परिचय मेळावा प. सा. नाट्यगृहात संपन्न झाला.

Bride-rallage organized by the Lewa community | लेवा समाजातर्फे वधू-वर मेळावा

सकल लेवा समाज वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी दीपप्रज्वलन करताना राम खर्चे. समवेत प्रवीण वायकोळे, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. जयंत ढाके, डॉ. ज्ञानदेव चोपडे आदी.

नाशिक : लेवा समाज कल्याण मंडळाच्या वतीने सकल लेवा समाज वधू-वर परिचय मेळावा प. सा. नाट्यगृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय लेवा समाज महासंघाचे संस्थापक सदस्य व सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी डॉ. राम खर्चे, सहायक निबंधक प्रवीण वायकोळे, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. जयंत ढाके, डॉ. ज्ञानदेव चोपडे आदी उपस्थित होते. यावेळी राम खर्चे यांनी समाज परंपरा व समाजप्रबोधन यावर भाष्य केले. याप्रसंगी लेवा समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष संजय वायकोळे यांनी मेळाव्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे सरचिटणीस अनिल महाजन, उपाध्यक्ष नितीन लोखंडे, प्रमोद करांडे, खजिनदार अरविंद अत्तरदे आदींनी केले.

Web Title: Bride-rallage organized by the Lewa community