पिंपळगाव मोरच्या लाचखोर मुख्याध्यापकास अटक
By Admin | Updated: December 17, 2015 00:45 IST2015-12-17T00:44:12+5:302015-12-17T00:45:12+5:30
पिंपळगाव मोरच्या लाचखोर मुख्याध्यापकास अटक

पिंपळगाव मोरच्या लाचखोर मुख्याध्यापकास अटक
नाशिक : शालेय पोषण आहाराचा धनादेश देण्यासाठी बचतगटाकडून तीन हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम घेणारे इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोरच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत गांगुर्डे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़ १६) रंगेहाथ पकडले़
जिजामाता महिला बचतगटास पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार पुरविण्याचा ठराव केला होता़ त्यानुसार या मुलांना पोषण आहार पुरविला जात होता़
याबाबत बचतगटाच्या अध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार केली़ त्यानुसार बुधवारी (दि़ १६) दुपारी एक वाजेच्या सुमारास मुख्याध्यापक गांगुर्डे यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रुपये घेताच अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी गांगुर्डे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)