कादवा पुलाचे कठडे तोडून आयशर टेम्पो नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 22:50 IST2021-09-13T22:49:29+5:302021-09-13T22:50:20+5:30
निफाड : नाशिककडून निफाड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास निफाड येथील कादवा पुलावरून जात असताना कठडे तोडून कादवा नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

कादवा पुलाचे कठडे तोडून आयशर टेम्पो नदीपात्रात
निफाड : नाशिककडून निफाड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास निफाड येथील कादवा पुलावरून जात असताना कठडे तोडून कादवा नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ बीवाय ६२५३) हा पहाटे पाचच्या सुमारास नाशिक बाजूकडून निफाड बाजूकडे जात होता. सदर आयशर टेम्पो निफाडच्या कादवा पुलावरून जात असताना पहाटेच्या अंधारात सदर टेम्पोची पुलाच्या लोखंडी कठड्यांना धडक बसून तो कादवा नदीवरील जुन्या आणि नव्या पुलाच्या मधोमध पडला.
दोन्ही पुलांच्या मधोमध पडल्याने सदर टेम्पो हळूहळू खाली गेल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. सदरची घटना निफाड पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर निफाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक सागर घोलप हे करीत आहेत. दुपारी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त आयशर टेम्पो नदीपात्रातून वर काढण्यात आला.