कारची काच फोडून लॅपटॉप चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:20 IST2021-02-17T04:20:38+5:302021-02-17T04:20:38+5:30

---- मोलकरणीचा दागिन्यांवर डल्ला नाशिक : घरकाम करणाऱ्या मोलकरणीने महिलेच्या घरातील १ लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला ...

Breaking car glass and stealing laptop | कारची काच फोडून लॅपटॉप चोरी

कारची काच फोडून लॅपटॉप चोरी

----

मोलकरणीचा दागिन्यांवर डल्ला

नाशिक : घरकाम करणाऱ्या मोलकरणीने महिलेच्या घरातील १ लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत घरमालकीणकडून मोलकरणीविरुद्ध संशय व्यक्त केल्याने मोलकरणीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणू राम कनोजिया (२६ रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) असे संशयित मोलकरणीचे नाव आहे. याबाबत श्रद्धा जितूकुमार साळुंखे (रा. खंडेरावनगर, पाथर्डी शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साळुंखे यांच्याकडे कनोजिया ही महिला घरकाम करते. दि. १४ ते १८ दरम्यान साळुंखे यांच्या घरातील बेडरूमच्या कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले. अचानक घरातील दागिने बेपत्ता झाल्याने साळुंखे यांनी मोलकरणीवर संशय व्यक्त घेतला आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

Web Title: Breaking car glass and stealing laptop