‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:16 IST2018-08-18T23:20:27+5:302018-08-19T00:16:23+5:30

दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न येत असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Breakdown of the rules on 'Shree' fest | ‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न

‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न

ठळक मुद्देमंडळांमध्ये अस्वस्थता : मंडपाला अडचणी

नाशिक : दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न येत असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नाशिकमध्ये अन्य कोणत्याही सणांपेक्षा सर्वाधिक उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. नवरात्र किंवा दहीहंडी हे सण त्यातुलनेत उत्साहाने साजरे केले जात नसले तरी गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवांवर सातत्याने निर्बंध येत आहेत. नाशिकमध्ये सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच महापालिकेने न्यायालयाच्या आदेशासंदर्भातील निर्बंध जाहीर करण्यासाठी बैठक बोलाविली होती ती होऊ शकली नसली तरी मनपाने संकेतस्थळावर रस्त्यावरील उत्सवांची नियमावली तयार केली आहे.
खड्डे खोदल्यास दंड
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने याआधीच खड्डे खोदण्याबाबत निर्बंधांचे धोरण ठरविले असून, त्यानुसार रस्त्यात बेकायदा खड्डे खोदल्यास दंड करण्यात येणार आहे. त्यानुसार मोठ्या खड्ड्यासाठी पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे अधिक अस्वस्थ आहेत.

Web Title: Breakdown of the rules on 'Shree' fest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.