दरवाढीला ब्रेक : कांदा विक्रेत्यांचा भ्रमनिरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 11:00 PM2021-09-27T23:00:29+5:302021-09-27T23:00:59+5:30

उमराणे : गेल्या आठवड्यात उन्हाळी कांदा दरात तब्बल तीनशे ते पाचशे रुपयांची झालेली अनपेक्षित वाढ त्याच आठवड्यापुरती मर्यादित राहिल्याने कांदा विक्रेते, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मागील आठवड्यात १,८०० रुपयांवरून २,३०० रुपयांपर्यंत उसळी घेतलेल्या कांद्याचा दर चालू आठवड्यात २,५०० रुपयांपर्यंत होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे.

Break in price hike: Onion sellers disillusioned | दरवाढीला ब्रेक : कांदा विक्रेत्यांचा भ्रमनिरास

दरवाढीला ब्रेक : कांदा विक्रेत्यांचा भ्रमनिरास

Next
ठळक मुद्देमागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याचा परिणाम

उमराणे : गेल्या आठवड्यात उन्हाळी कांदा दरात तब्बल तीनशे ते पाचशे रुपयांची झालेली अनपेक्षित वाढ त्याच आठवड्यापुरती मर्यादित राहिल्याने कांदा विक्रेते, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मागील आठवड्यात १,८०० रुपयांवरून २,३०० रुपयांपर्यंत उसळी घेतलेल्या कांद्याचा दर चालू आठवड्यात २,५०० रुपयांपर्यंत होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी उन्हाळी कांद्याचा दर घसरुन १,५०० रुपयांपर्यंत आला होता. या काळात एकीकडे चाळीत साठवणूक केलेला कांदा माल खराब होत असतानाच बाजारभाव अजून कमी होतील की काय, या भीतीपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला होता. परिणामी बाजारात आवक वाढली होती.

तर दुसरीकडे मिळत असलेला बाजारभाव बघता कांदा उत्पादनापासून मिळणारा नफा तर दूरच, परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हात आखडता घेतला होता. त्यामुळे मागील आठवड्यात आवकवर याचा परिणाम झाल्याने बाजारभावात तब्बल ३०० ते ५०० रुपयांची अनपेक्षित वाढ झाली होती.
अचानक वाढलेल्या बाजारभावामुळे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव चालू आठवड्यात अजून वाढेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती. त्यामुळे उमराणे बाजार समितीत सोमवारी (दि. २७) कांदा आवकेत वाढ झाली होती. मात्र, बाजारभाव वाढण्याऐवजी सरासरी दरात २०० ते ३०० रुपयांची घसरण झाल्याने कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ सद्यस्थितीत कमी प्रमाणात कांदा शिल्लक असून, तोही खराब होत आहे. त्यामुळे कांदा विक्री करावा की नाही, याबाबत सभ्रंमावस्था निर्माण झाली आहे.

दरम्यान, स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८३ ट्रॅक्टर, २०४ पिकअप आदी वाहनांतून सुमारे १२ ते १३ हजार क्विंटल कांदा आवक झाल्याचा अंदाज आहे. बाजारभाव कमीत कमी ८०० रुपये, तर जास्तीत जास्त २२०० रुपये, तर १८०० रुपये सरासरी दराने कांदा विक्री झाला.

Web Title: Break in price hike: Onion sellers disillusioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.