शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:17 IST

दळवटच्या चौघांना अटक, गुन्हा दाखल

ठळक मुद्देधनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

पाळे खुर्द :  दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याची घटना घडली असून त्यामुळे धरणातील सुमारे सात ते आठ दसलक्षघनफूट इतके पाणी वाया गेले आहे. धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्र वारी (दि.१७) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडण्यात आल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोंढा सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. शेतक-यांनी लगोलग गेटकडे धाव घेतली असता तेथे चार इसम संशयास्पद स्थितीत आढळले. शेतक-यांनी संबंधित इसमांना पकडले आणि धनोली गावातील मंदिरात त्यांना कोंडून ठेवले. या इसमांनी चौकशी केली असता ते चौघेही दळवट येथील रहिवाशी निघाले. हि बातमी पसरताच धनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची कुणकुण प्रशासकीय यंत्रणेला लागताच संपूर्ण यंत्रणा धनोली गावात रात्री नऊ वाजेच्या सुमारास हजर झाली. कळवणचे तहसीलदार बंडू कापसे तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांचेसह अभोणा पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान,ल धरणाचे गेट तोडणारे दळवट येथील प्रमोद बयाजी पवार (६०), सोनू बंडू गावित(६०), शंकर केवजी चव्हाण (५५) आणि सुभाष येवाजी पवार (६०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून कलम ३ व ७ अन्वये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी(दि.१९) सदर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण