सैनिकांच्या शौर्यामुळे देशात शांतता नांदते : राष्टपती रामनाथ कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:27 PM2019-10-10T18:27:02+5:302019-10-10T18:29:33+5:30

आर्मी एव्हीएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांना मानवंदना दिली. तर संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडीअर सरबजीत सिंग बावा भल्ला यांनी केले. ‘प्रेसिडेंट कलर्स’ला मानवंदना देण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींनी कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांना ध्वज प्रदान केला.

The bravery of the soldiers makes peace in the country | सैनिकांच्या शौर्यामुळे देशात शांतता नांदते : राष्टपती रामनाथ कोविंद

सैनिकांच्या शौर्यामुळे देशात शांतता नांदते : राष्टपती रामनाथ कोविंद

Next
ठळक मुद्देआर्मी एव्हीएशन ‘प्रेसिडेंट कलर्स’ने सन्मानितआर्मी एव्हीएशनला २७३ सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सैन्याच्या हवाई दलाने गेल्या ३२ वर्षांत भारतातच नव्हे जगात उत्तम कामगिरी बजावली असून, देशाच्या लष्करी क्षमतेत सिद्धता निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सैनिकांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. गांधीनगर येथील आर्मी एव्हीऐशन ट्रेनिंग स्कूलचा राष्टÑपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर्स’ या ध्वजाने सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.


गांधीनगरच्या आर्मी ऐव्हीएशन ट्रेनिंग स्कूलच्या लष्करी मैदानावर झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमास महाराष्टÑाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, लेफ्टनंट जनरल पी. एस. राजेश्वर, लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, लेफ्टनंट जनरल कंवलकुमार, मधुलिका रावत आदी उपस्थित होते. राष्टÑपती कोविंद पुढे म्हणाले, सैन्याच्या हवाई दलाने गेल्या ३२ वर्षांत अतुलनीय साहस आणि शौर्याचा परिचय देत अनेक मोहिमा यशस्वी केल्या. या कालावधीत आर्मी एव्हीएशनला २७३ सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले. सियाचीनसारख्या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दृढनिश्चयाचा परिचय देत भारतीय सेनेला अभिमान वाटेल, अशी कामगिरी या सैनिकांनी केली. गेल्या वर्षी आपण सियाचीन भागातील कुमार चौकीस भेट दिली. तेव्हा आव्हानात्मक स्थितीची जाणीव झाली. २० हजार आणि त्याहून अधिक उंचीवर वैमानिक कार्यरत असतात. देशात आपण शांततेत वास्तव्य करतो. सीमेवरील शूर जवानांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते. असे सांगून राष्ट्रपतींनी श्रीलंकेमधील ‘आॅपरेशन पवन’ आणि येमेनमधील ‘आॅपरेशन मेघदूत’मध्ये आव्हानात्मक परिस्थितीत या दलाने अतुलनीय कामगिरीचा तसेच संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत भारताचे दूत म्हणून जवानांनी उत्तम कामगिरी केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आर्मी एव्हीएशन जवानांचा पराक्रम भारतीय सेनेचे जवान आणि अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत आहे, असेही ते म्हणाले. आर्मी एव्हीएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.
यावेळी आर्मी एव्हीएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांना मानवंदना दिली. तर संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडीअर सरबजीत सिंग बावा भल्ला यांनी केले. ‘प्रेसिडेंट कलर्स’ला मानवंदना देण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींनी कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांना ध्वज प्रदान केला. या ऐतिहासिक सोहळ्याचे निशाण स्वीकारले. आकाशातून तीन ध्रुव हेलिकॉप्टरच्या समन्वय कृतीने ध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी आणि आर्मी एव्हीएशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The bravery of the soldiers makes peace in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.