घोटी : घोटी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत शनिवारी इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात धाडसी चोºया करणाºया टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोºयांचे सत्र चालू आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने पुढाकार घेऊन पोलीस निरीक्षक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली असता कावनई येथील हरिश्चंद्र दगडू रण व सुरेश दगडू रण यांना संशयावरून ताब्यात घेतले असता त्यांच्या घरातून घोटी, वाडीवºहे व इगतपुरी आदी ठिकाणाहून चोरी गेलेला मुद्देमाल मिळून आला. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांनी दिले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हा शाखेने व घोटी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
धाडसी चोºया करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:10 IST