धाडसी झुंज : एक हात बिबट्याच्या जबड्यात तरीही चिमुकला थेट भिडला बिबट्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 03:03 PM2020-11-04T15:03:24+5:302020-11-04T15:07:44+5:30

बुधवारी सकाळी त्वरित पिंजरा लावण्यात आला आहे. सोनारी शिवारात असलेली उसाची शेती अन‌् दारणेचे खोरे यामुळे या भागात बिबट्याचा वावर आहेच,

Brave fight: One hand in the jaw of the leopard, but chaild directly attacked the leopard | धाडसी झुंज : एक हात बिबट्याच्या जबड्यात तरीही चिमुकला थेट भिडला बिबट्याला

धाडसी झुंज : एक हात बिबट्याच्या जबड्यात तरीही चिमुकला थेट भिडला बिबट्याला

Next
ठळक मुद्देदुसऱ्या हाताने मानेवर मारले बुक्केसोनारीत पहिलीच घटना

नाशिक : वेळ दुपारी साडेतीन वाजेची... ठिकाण सोनांबेजवळील सोनारी गाव... मक्याच्या शेतात काळुंगे वस्तीवर नेहमीप्रमाणे मक्याची कणसे खुडायचे काम सुरु... काही समजायच्या आत चिमुकल्या गौरवच्या डोळ्यांपुढे बिबट्या येतो... गौरव तेथून पळणार तोच बिबबट्याने झडप घालतो अन त्याचा उजवा हात जबड्यात घेतो... गौरव घाबरला मात्र त्याने धाडसाने आक्रमक बिबट्याशी झुंज देत त्याचा हल्ला परतून लावला अन‌् सुदैवाने त्याला यशही आले.

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली -घोटी रस्त्यालगत असलेल्या सोनांबे गावालगतच्या सोनारी या लहानशा गावात संजय काळुंगे यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मक्याच्या शेतात मशागतीची कामे सुरु होती. शाळांना सध्या सुटी असल्याने संपुणे कुटुंब शेतीवरच होते. काही महिला, पुरुष शेतमजूर सोंगणी करत होते तर काही मक्याची कणसे खुडत होती. यावेळी जनता विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणारा गौरव काळुंगे हा शाळकरी मुलगाही कणसे तोडून पाटीमध्ये टाकत होता. याचवेळी अचानकपणे शेतातील दुसऱ्या बाजूने त्याच्या समोरुन भला मोठ्या बिबट्या आला. साहजिकच गौरवदेखील बिबट्याला डोळ्यांपुढे काही फुटांवर बघून घाबरला. यावेळी तो शेतातून बाहेर जाणारच तेवढ्यात बिबट्याने झडप घेत त्याचा उजवा हात जबड्यात घेतला; मात्र हा पठ्ठयाही घाबरला नाही, त्याने दुसऱ्या हाताने बिबट्याच्या मानेला जोरजोराने बुक्के मारण्यास सुरुवात केली, त्यामुळे बिबट्याने जबड्यात घेतलेला गौरवचा हात सोडून पळ काढला आणि गौरवने दाखविलेल्या धाडसामुळे त्याचा प्रतिकार यशस्वी झाला. यावेळी त्याच्या आवाजाने आजुबाजुचे शेतमजूर, त्याचे वडील संजय, काका सोनांबेचे पोलीस पाटील चंद्रभान पवार आदींनी धाव घेतली. यावेळी रक्तबंबाळ झालेला गौरवचा हात बघून घरातील महिलाही भेदरल्या. त्यास तत्काळ नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल. बुधवारी (दि.४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गौरवला डिस्चार्जही देण्यात आला.

सोनारीत पहिलीच घटना
सोनारी भागात बिबट्याचे दर्शन झाले आहेत, मात्र हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असल्याने गावात काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले अहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल पंढरीनाथ आगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच बुधवारी सकाळी त्वरित पिंजरा लावण्यात आला आहे. सोनारी शिवारात असलेली उसाची शेती अन‌् दारणेचे खोरे यामुळे या भागात बिबट्याचा वावर आहेच, नागरिकांनी खबरदारी घेत शेतीची कामे करावी व वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

Web Title: Brave fight: One hand in the jaw of the leopard, but chaild directly attacked the leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.