शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

अंध बांधवांसाठी ब्रेल लायब्ररी

By admin | Updated: February 27, 2017 00:19 IST

भाग्यश्री मुळे : नाशिक ते येतात... आपल्या आवडीची पुस्तके घेतात आणि तन्मयतेने वाचतात... नाशिकमध्ये आॅडिओ लायब्ररी पाठोपाठ ब्रेल लिपीच्या खास लायब्ररीने हे शक्य झाले आहे.

भाग्यश्री मुळे : नाशिकते येतात... आपल्या आवडीची पुस्तके घेतात आणि तन्मयतेने वाचतात...वाचनाचा आंनद घेताना त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव समाधानाचे असतात. अर्थात, त्या मागे असते जिज्ञासा... अंध असतानाही वाचनातून ज्ञानवर्धनाच्या त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो! नाशिकमध्ये आॅडिओ लायब्ररी पाठोपाठ ब्रेल लिपीच्या खास लायब्ररीने हे शक्य झाले आहे.शिक्षण आणि ज्ञान हे शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन संधी निर्माण करण्यासाठी उज्ज्वल भविष्याची चावी आहे. अंधबांधवांना या चावीच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना मिळावा यासाठी राज्यभर ब्रेल लायब्ररी सुरुकरण्यात आली आहे. याचे पहिले पाऊल सातपूरच्या नॅब संकुल येथे नॅब महाराष्ट्र-अ‍ॅम्वे अ‍ॅपॉर्च्युनिटी फाउंडेशन ब्रेल लायब्ररीचे नुकतेच उद््घाटन करण्यात आले. ब्रेल लिपीतील शैक्षणिक पुस्तके, फिक्शन, सेल्फ-हेल्प, जनरल नॉलेज आदि प्रकारांतील एक हजार पुस्तके आणि नियतकालिक यांची ब्रेल आवृत्तीतील पुस्तके व ६०० हून अधिक प्रकारची आॅडिओ सीडी प्रकारातली पुस्तके या लायब्ररीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या राज्यातील संस्थांसाठी अशा प्रकारच्या ३१ लायब्ररी तयार करण्याचा निर्धार केला असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत या लायब्ररींचे उद््घाटन करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यात २० हजार, लातूर जिल्ह्यात १० हजार, अमरावती जिल्ह्यात २० हजार, सोलापूर जिल्ह्यात ३३ हजार, कोल्हापूर जिल्ह्यात १७ हजार अंध बांधव आहेत. या व्यक्तिंपर्यंत वाचन संस्कृती पोहचविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी त्यांना एका कंपनीच्या उत्तरादायित्व निधीतून सुमारे साडेसोळा लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.नॅबच्या मदतीने येथे ब्रेल आॅडिओ हायब्रीड लायब्ररी स्थापन करण्यात आली आहे. या लायब्ररीमुळे तळागाळातील अंध व्यक्तिंना सर्वप्रकारच्या साहित्यांचा, शास्त्रांच्या पुस्तकांचा लाभ घेता येणार आहे. या लायब्ररीत वाचनाचा आनंद मोफतपणे घेता येणार असून, अंध बांधवांबरोबरच बहुविकलांग व्यक्तिंनाही ‘हावभाव किंवा खुणांच्या’ भाषेतून साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे. त्यासाठी येथे विशेष शिक्षकही कार्यरत आहेत. क्रमिक आणि अवांतर पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही लायब्ररीत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.