ब्राह्मणगावी श्रीराम जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:17+5:302021-04-22T04:14:17+5:30
श्रीराम भजनी मंडळाच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत हरी भजन कार्यक्रम झाला. माध्यान्ही ‘प्रभू रामचंद्र भगवान की ...

ब्राह्मणगावी श्रीराम जन्मोत्सव
श्रीराम भजनी मंडळाच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत हरी भजन कार्यक्रम झाला. माध्यान्ही ‘प्रभू रामचंद्र भगवान की जय’च्या घोषात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव पाळणा, आरती, गौळण, अभंग सादर करत मोजक्या संख्येने उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीराम मंदिर भक्त मंडळाचे सदस्य पुरोहित अविनाश जोशी, वैभव जोशी, श्रीधर अहिरे, ज्येष्ठ नेते राघो नाना अहिरे, गोरख जाधव, सरपंच किरण अहिरे, रवींद्र जाधव, रवींद्र चव्हाण, बाळा शेवाळे, पोपटराव शेवाळे, खुशाल बागुल, सुमित धुमाळ, हेमंत कानडे भाविक उपस्थित होते.
फोटो - २१ ब्राह्मणगाव राम
ब्राह्मणगाव येथील श्रीराम मंदिर
===Photopath===
210421\21nsk_11_21042021_13.jpg
===Caption===
फोटो - २१ ब्राह्मणगाव राम ब्राह्मणगाव येथील श्रीराम मंदिर