ब्राह्मणगावी डेंग्यूसदृश रूग्ण
By Admin | Updated: June 3, 2014 00:53 IST2014-06-03T00:18:02+5:302014-06-03T00:53:08+5:30
ब्राह्मणगाव : येथे गत सप्ताहात सलग दोन डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने त्यांना उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्राह्मणगावी डेंग्यूसदृश रूग्ण
ब्राह्मणगाव : येथे गत सप्ताहात सलग दोन डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने त्यांना उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यश राजेंद्र कुमावत (१३) तसेच यशोमती समाधान अहिरे (९) हे दोन डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गावात डासांचे प्रमाण पाहता डास प्रतिबंधक फवारणी करणे, गटारी साफ करणे व गटारीतील काढलेल्या घाणीची त्वरित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही आलेल्या रुग्णांची त्वरित रक्त तपासणी करणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावात घरोघरी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांनी संयुक्तिक लक्ष घालून गावात स्वच्छता अभियान व प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे . (वार्ताहर)