औंदाणे येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: July 19, 2016 00:12 IST2016-07-19T00:06:34+5:302016-07-19T00:12:16+5:30

विरजण : विहिरीचे पाणी पाहताना दुर्घटना

Boy's death by lying in a well in Aunda | औंदाणे येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

औंदाणे येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

सटाणा : चांगला पाऊस झाल्याने वर्षानुवर्षे कोरड्या असलेल्या विहिरीत दोन दिवसांपूर्वी सुमारे ३० फूट पाणी आले. त्या आनंदात विहिरीला आलेलं पाणी पाहण्यासाठी बापलेक विहिरीजवळ गेले.
धूळ खात पडलेला विद्युतपंप चालू होतो की नाही याची वडील खात्री करत असतानाच मुलगा अचानक विहिरीत पडून बुडाला. मुलगा विहिरीत पडल्याचे पाहताच वडिलांनाही चक्कर आली आणि तेही जमिनीवर कोसळले. विहिरीला अनेक वर्षांनी आलेल्या पाण्याचा आनंद क्षणिक ठरला.
तालुक्यातील औंदाणे येथील प्रगतिशील शेतकरी किशोर सुखदेव खैरनार यांची हत्ती नदीजवळ विहीर आहे. वर्षानुवर्षे कोरड्या असलेल्या या विहिरीला मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने चक्क तीस फुटापर्यंत पाणी आले.
विहिरीला पाणी आले म्हणून अत्यानंद झालेले किशोर खैरनार रविवारी आनंदाच्या भरात त्यांच्या १५ वर्षीय मुलगा प्रशांतलाही पाणी पाहण्यासाठी विहिरीजवळ घेऊन गेले. अनेक वर्षांपासून बंद असलेला विद्युतपंप चालू होतो की नाही याची खात्री करत असताना विहिरीतले पाणी पाहत असलेल्या प्रशांतचा अचानक तोल जाऊन तो विहिरीत कोसळला. तब्बल दीडशे फूट खोल असलेल्या विहिरीत प्रशांत पडल्याचे समजताच वडील गर्भगळीत होऊन चक्कर आल्याने जमिनीवर कोसळले.
परिसरात पेरणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी विहिरीजवळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत प्रशांतची प्राणज्योत मालविली होती. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोहणाऱ्या एका व्यक्तीला विहिरीत उतरविले.
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या ह्रदयद्रावक घटनेने औंदाणे गावावर
शोककळा पसरली आहे. प्रशांत सटाणा येथील मराठा हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता. (वार्ताहर)

Web Title: Boy's death by lying in a well in Aunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.