शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

मालेगावी आईच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप

By admin | Updated: January 19, 2017 00:35 IST

मालेगावी आईच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप

मालेगाव : दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून १६ मार्च २०१४ रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास आईचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपी रवींद्र महारू खैरनार (३१), रा. पाटणे यास जिल्हा न्यायाधीश एस. एस. खंडागळे यांनी दहा हजार रुपये दंड व जन्मठेप तसेच दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. रूपचंद खैरनार हा त्याची पत्नी तोल्याबाईसह पाटणेत राहून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होता. त्याला लक्ष्मण व अंबादास हे दोन मुले असून, ती कामानिमित्त नाशिक येथे परिवारासह राहतात. त्यांच्या शेजारी चुलत सून सगुनाबाई महारू खैरनार व तिचा मुलगा रवींद्र महारू खैरनार, त्याची पत्नी मनीषा आणि पाच नातवंडांसह मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते.  १० मार्च २०१४ पासून रवींद्र हा अति मद्यसेवन करून आई सगुनाबाई व पत्नी मनीषा यांच्याशी भांडण करीत होता. सासू तिच्या सोबत जाण्यास तयार न झाल्याने तिने सासूला शंभर रुपये दिले व मुलांसह माहेरी निघून गेली. त्यानंतर रवींद्रने सगुनाबाईकडून शंभर रुपये हिसकावून घेत आईशी भांडण व मारहाण करीत होता. दारू पिण्यास पैसे न दिल्याने १५ मार्च २०१४ रोजी रात्री आठ वाजेपासून सगुनाबाईशी तिचा मुलगा रवींद्र भांडण करीत होता. १६ मार्च २०१४ रोजी पहाटे पावणेपाच वाजता रवींद्र व सगुनाबाई यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणाचा आवाज ऐकू आल्याने फिर्यादी रूपचंद खैरनार व नानाजी खैरनार घरात गेले असता तो आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत होता. भांडणात मध्ये पडलात तर चाकूने ठार मारण्याची धमकी दिली. आई काही हालचाल करीत नाही व बोलत नाही असे ओरडत आरोपी रवींद्र घराबाहेर आला. वसंत खैरनार यांनी घरात बघितले असता सगुनाबाईचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)