शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:32 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी घोट तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर घोट व परिसरातील जनता सामूहिक बहिष्कार टाकेल, असा इशारा घोट येथे आयोजित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

ठळक मुद्देघोट तालुक्याची निर्मिती करा : सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : लोकसभा निवडणुकीपूर्वी घोट तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर घोट व परिसरातील जनता सामूहिक बहिष्कार टाकेल, असा इशारा घोट येथे आयोजित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.घोट परिसरात ५० ते ६० गावे येतात. ६० ते ७० किमीचे अंतर पार करून चामोर्शी येथे तालुकास्थळी जावे लागते. घोट तालुक्याची निर्मिती करावी, यासाठी स्थानिक जनतेने मागील २६ वर्षांपासून आंदोलने, मोर्चे, निवेदन याद्वारे पाठपुरावा केला. स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही वेळोवेळी मागणी केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घोट तालुक्याची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अनुभव घोट परिसरातील जनतेला येत चालला आहे. घोट परिसरातील समस्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक गावांपर्यंत मूलभूत सोयीसुविधा सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत. लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे या परिसरातील गावे विकासापासून कोसो दूर राहिली आहेत. अशा अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना निवडून देऊन कोणताही उपयोग नाही. त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला.पत्रकार परिषदेला भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष तथा घोट तालुका संघर्ष समितीचे अशोक पोरेड्डीवार, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, सरपंच विनय बारसागडे, पं.स.सदस्य सुरेश कामेलवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते संजय वडेट्टीवार, सुशील शहा, उपसरपंच साईनाथ नेवारे, वसंत दुधबावरे, गुरूदास वैरागडे, ग्रा.पं.सदस्य गिरीश उपाध्ये, परशुराम दुधबावरे, बबन धोडरे, दिनकर लाकडे, बाबुराव भोवरे, बंडू जुआरे, मंसराम पिपरे, किशोर बुराडे, शरद नल्लुवार हजर होते.

टॅग्स :Electionनिवडणूक