सदोष मनुष्यवधप्रकरणी दोघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:51 IST2018-09-01T13:50:39+5:302018-09-01T13:51:14+5:30
नाशिक : दारू पित असताना झालेली शिवीगाळ व वादातून तिघांनी एकावर दारुच्या बाटलीने वार तसेच अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी विभुतीकुमार बिंदूकुमार सिंग व नीरजसिंग त्रिभुवनसिंग (रा़ दत्तनगर, कारगिल चौक , नाशिक) या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़१) सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षाा सुनावली़

सदोष मनुष्यवधप्रकरणी दोघांना सक्तमजुरी
नाशिक : दारू पित असताना झालेली शिवीगाळ व वादातून तिघांनी एकावर दारुच्या बाटलीने वार तसेच अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी विभुतीकुमार बिंदूकुमार सिंग व नीरजसिंग त्रिभुवनसिंग (रा़ दत्तनगर, कारगिल चौक , नाशिक) या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़१) सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षाा सुनावली़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात तेरा साक्षीदार तपासून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़
सिडकोतील कारगिल चौकात १५ जुलै २०१६ रोजी विभुतीकुमार सिंग, नीरजसिंग, राधेसिंग व मयत अर्जुन दीपक वाघेला हे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एकत्र दारु पित होते़ यावेळी मद्याच्या नशेत वाघेला याने तिघा आरोपींना आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याने त्यांनी संतप्त होऊन दारूच्या बॉटलने त्याचे डोके, हनुवटी व कानाखाली गंभीर दुखापत केली़ तसेच त्यास ओढत रस्त्यावर नेऊन वाघेला याच्या अंगावर मॅक्झिमा ही चारचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वाघेलाचा दहा - अकरा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
प्रधान न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील कडवे यांनी तपासलेल्या तेरा साक्षीदारांमध्ये प्रत्यक्षदर्शी महिला साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांचे जबाब महत्वाचे ठरले़ साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावे यावरून आरोपी विभुतीकुमार सिंग, नीरजसिंग यांना भादंवि कलम ३०४ (२) सदोष मनुष्यवधाच्या गुन्'ात दोषी धरून सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली़ दरम्यान, यातील तिसरा आरोपी राधेसिंग हा अद्यापही फरार आहे़