पगारेसह दोघांची धुळे कारागृहात रवानगी

By Admin | Updated: May 15, 2014 23:56 IST2014-05-15T23:45:50+5:302014-05-15T23:56:59+5:30

नाशिकरोड : कुविख्यात गुंड भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या झाल्यानंतर कारागृहात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्षभरापासून चांगले-सोनवणे दुहेरी हत्त्याकांडातील मुख्य संशयित अर्जुन पगारे व अन्य दोघांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Both of them along with Pagare are sent to jail in Dhule | पगारेसह दोघांची धुळे कारागृहात रवानगी

पगारेसह दोघांची धुळे कारागृहात रवानगी

नाशिकरोड : कुविख्यात गुंड भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या झाल्यानंतर कारागृहात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्षभरापासून चांगले-सोनवणे दुहेरी हत्त्याकांडातील मुख्य संशयित अर्जुन पगारे व अन्य दोघांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
शहरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून गॅँगवारमध्ये भडका उडून खुनाच्या घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी मोहन चांगले व दीपक सोनवणे यांचे दुहेरी हत्त्याकांड घडल्यानंतर शहर हादरून गेले होते. या प्रकरणी अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे, गिरीश शे˜ी यांना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यामुळे पगारे-चांगले टोळीतील वैमनस्य चांगलेच वाढले होते. चांगले टोळीने दुहेरी हत्त्याकांडाचा बदला घेत दहा दिवसांपूर्वीच अर्जुन पगारेचा भाऊ कुविख्यात गुंड भीम पगारे याची गोळ्या घालून व वार करून निघृर्ण हत्त्या केल्याची फि र्याद मोनिका काळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेली आहे़
मध्यवर्ती कारागृहात दुहेरी हत्त्याकांडातील संशयित अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे व गिरीश शे˜ी न्यायालयीन कोठडीत आहे, तर याच गुन्‘ातील वर्षभरापासून फरारी असलेला आरोपी राकेश कोष्टी हा काही दिवसांपूर्वीच न्यायालयात शरण आला. भीम पगारे खुनातील संशयितांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने न्यायालयाकडून परवानगी घेऊन दुहेरी हत्त्याकांडातील संशयित अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे, गिरीश शे˜ी यांची चोख पोलीस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी धुळे जिल्हा कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them along with Pagare are sent to jail in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.