जातवैधता बनावट प्रमाणपत्र दोघांना अटक
By Admin | Updated: March 28, 2015 00:49 IST2015-03-28T00:47:27+5:302015-03-28T00:49:12+5:30
जातवैधता बनावट प्रमाणपत्र दोघांना अटक

जातवैधता बनावट प्रमाणपत्र दोघांना अटक
नाशिक : बनावट जातवैधता प्रमाणपत्र बनवून देणारे संशयित ललित सिरसाट (रा़ विद्यानगर, देवळा) व सचिन देवरे (रा़ शिवमुद्रा सोसायटी) या दोघा दलालांविरोधात संजय धुमाळ यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
तलवार बाळगणाऱ्यांवर गुन्हा
पंचवटीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या नंदू वराडे या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ त्यास न्यायालयाने प्रथम एक दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली़
सातपूरच्या युवकाची आत्महत्त्या
सातपूरच्या प्रबुद्धनगरमधील सुरेश आसाराम हिवाळे (३०) या युवकाने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.