विष प्राशन केल्याने शहरात दोघे मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:13 IST2020-08-31T22:58:51+5:302020-09-01T01:13:48+5:30
नाशिक : विष प्राशन केल्याने दोघांचा शहरात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 30) घडली.

विष प्राशन केल्याने शहरात दोघे मृत्युमुखी
नाशिक : विष प्राशन केल्याने दोघांचा शहरात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 30) घडली. पिहल्या घटनेत धर्मराज दगडु दंडगव्हाळ (64, रा.गोविंदनगर) यांनी राहत्या घरात विष सेवन केले होते. त्यांच्यावर खासगी रु ग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसर्या घटनेत पेठरोडवरील दत्तनगर परिसरात राहणार्या अर्जुन रामदास शेळके (35) यांनी देखील विष प्राशन केले होते. त्यांच्यावर बिटको रु ग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.