गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:12 IST2021-01-11T01:11:38+5:302021-01-11T01:12:22+5:30

गळफास घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Both committed suicide by hanging | गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

नाशिक : गळफास घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
गंगापूर रोड परिसरातील उत्कर्षनगर, झोपडपट्टी परिसरात राहणारे संजय शंकर निसाळ यांनी अज्ञात कारणातून शनिवारी (दि. ९) सव्वापाच वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना, लोखंडी पाइपला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याने ते मृत्युमुखी पडले. दुसऱ्या घटनेत हनुमान चौक, सिडको परिसरात राहणारे भटू जगन्नाथ चौधरी यांनी शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घराच्या हॉलमध्ये लोखंडी अ‍ॅँगलला दोरीच्या सहायाने गळफास घेतला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापासून शहरात आत्महत्त्येचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 
मटका जुगार 
खेळणारे ताब्यात
नाशिक :  वडाळा रोड परिसरातील गोविंदनगर शिवारातील नासर्डीनदीच्या काठाला बसून बेकायदेशीररीत्या कल्याण मटका जुगार खेळणाऱ्यांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित रवी हनुमंता गुंजाळ (रा. लक्ष्मणनगर, पंचवटी), सुभाष अशोक मुर्तडक (रा. रामकृष्णनगर), अजय राजू इंगळे (रा.वडारवाडी) हे तिघे या ठिकाणी जुगार खेळताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी शनिवारी (दि. ९) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास या संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Both committed suicide by hanging