दुचाकी जाळपोळ प्रकरणी दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:50 IST2019-09-16T00:50:15+5:302019-09-16T00:50:31+5:30
पांडवनगरी परिसरात सोसायटीच्या वाहनतळात प्रवेश करून सर्रासपणे नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयितांच्या वडाळागावातून मुसक्या आवळल्या आहेत.

दुचाकी जाळपोळ प्रकरणी दोघे ताब्यात
इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात सोसायटीच्या वाहनतळात प्रवेश करून सर्रासपणे नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयितांच्या वडाळागावातून मुसक्या आवळल्या आहेत. आकाशआरंभ सोसायटीच्या परिसरात नशा करण्यापासून दोघा संशयितांना रहिवाशांनी रोखल्याने त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.
पंधरवड्यापूर्वी पांडवनगरी परिसरातील आकाशआरंभ सोसायटीत राहणारे अजय उपासणी यांच्या मालकीच्या दोन दुचाकी सोसायटीच्या वाहनतळात रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पेटवून पळ काढला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट-२चे पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित सोनार, उपनिरीक्षक विजय लोंढे, युवराज पाटील, श्रीराम सपकाळ, प्रमोद दराडे, अन्सार सय्यद आदींनी वडाळागावातून शनिवार (दि.१३) रोजी संशयित आरोपी गणेश जडबुले (२५, रा. रामोशीवाडा), उत्तम साळवे (२४, रा. राजवाडा) यांना अटक केली.