बॉश युनियनची १० रोजी निवडणूक

By Admin | Updated: June 5, 2014 00:50 IST2014-06-03T02:05:15+5:302014-06-05T00:50:51+5:30

सातपूर : येथील बॉश एम्प्लॉईज युुनियनच्या पदाधिकार्‍यांची त्रैवार्षिक निवडणूक १० जूनला घेण्यात येणार असून, सात पदांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

Bosch union's 10th election | बॉश युनियनची १० रोजी निवडणूक

बॉश युनियनची १० रोजी निवडणूक

सातपूर : येथील बॉश एम्प्लॉईज युुनियनच्या पदाधिकार्‍यांची त्रैवार्षिक निवडणूक १० जूनला घेण्यात येणार असून, सात पदांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सर्वच विद्यमान पदाधिकार्‍यांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर अध्यक्षपदासाठी विद्यमान सरचिटणीस हेमंत अहेर यांच्याबरोबरच माजी पदाधिकारी अविनाश नेरे तसेच मायको सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल टोके, तसेच प्रमोद भालेराव, पी. जे. पाटील आदि निवडणूक लढवित आहेत. सरचिटणीसपदासाठी विद्यमान उपाध्यक्ष प्रवीण पाटील आणि श्यामराव कदम हे आमने-सामने मैदानात उतरले आहेत. या दोघा पदाधिकार्‍यांसह सात उमेदवार आहेत. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी २१ उमेदवार असून, खजिनदारपदासाठी विद्यमान अजय चव्हाणके यांच्यासह आठ उमेदवार रिंगणात आहेत, तर सहसचिवपदाच्या दोन जागांसाठी विद्यमान नितीन बिडवई व संदीप दोंड यांच्यासह २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सात जागांसाठी एकूण ६३ उमेदवार रिंगणात असून, १० जूनला कंपनीच्या आवारात मतदान घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Bosch union's 10th election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.