शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे बोरस्ते

By admin | Updated: January 30, 2016 22:32 IST

दिंडोरी : उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन देशमुख

दिंडोरी : नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे भाऊसाहेब बोरस्ते, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन देशमुख यांची निवड झाली. नगरपंचायती निवडणूक होऊन त्यात कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेसने आघाडी घेत निवडणूक लढवली होती. त्यात कॉँग्रेसला सात, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या.कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दहा नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली होती, तर शिवसेना दोन, मनसे, भाजपा प्रत्येकी एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजपा, मनसे व अपक्ष या सात नगरसेवकांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी झाली होती. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीकडे बहुमत असल्याने त्यांचाच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित होते; परंतु शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत पदांच्या संभाव्य राजी-नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत निवडणुकीत प्रमोद देशमुख यांचा अर्ज दाखल करत निवडणूक लढवली, तर कॉँग्रेसने माजी सरपंच भाऊसाहेब बोरस्ते यांचा अर्ज दाखल केला होता. यावेळी गटनेते माजी आमदार रामदास चारोस्कर, आघाडीचे नगरसेवक, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, माधवराव साळुंखे, सुनील आव्हाड, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, डॉ. योगेश गोसावी, डॉ. अनिल सातपुते, श्याम हिरे, सुनील पाटील आदि उपस्थित होते. कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)