घोटीतील युवकाची लूट
By Admin | Updated: June 12, 2017 00:39 IST2017-06-12T00:38:51+5:302017-06-12T00:39:14+5:30
घोटीतील युवकाची लूट

घोटीतील युवकाची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मद्यसेवनास नकार देणाऱ्या घोटीच्या युवकाचा मोबाइल व रोकड तिघा संशयितांनी लुटल्याची घटना शनिवारी (दि़१०) भद्रकाली परिसरात घडली़ समाधान पांडुरंग भारस्कर तलवाडी परिसरात आला होता़ त्यास जयेश ऊर्फ जयड्या नाळे, लखन शिरसाठ आणि समाधान ऊर्फ सम्या गांगुर्डे यांनी मद्यसेवनाची मागणी केली़ मात्र, समाधान भारस्करने मद्यसेवनास नकार दिल्याने राग आलेल्या या तिघा संशयितांनी त्याचा मोबाइल, एक हजार ४३० रुपयांची रोकड असा ४ हजार रुपयांचा ऐवज बळजबरी लुटून नेला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़