‘बखर संस्थानांची’ पुस्तकाला उत्कृष्ट संदर्भग्रंथ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:56 IST2018-06-22T23:56:41+5:302018-06-22T23:56:57+5:30

‘बखर संस्थानांची’ पुस्तकाला उत्कृष्ट संदर्भग्रंथ पुरस्कार
नाशिक : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांचे वितरण पुणे येथील मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदमजी हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी सुनीत पोतनीस लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘बखर संस्थानांची’ या पुस्तकास संदर्भग्रंथ या विभागातला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा द्वितीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार आणि परचुरे प्रकाशनचे आप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.