बोलेरोच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:15+5:302021-01-22T04:13:15+5:30

-------------------------- सिन्नरला ६३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण सिन्नर : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये २८ जानेवारी रोजी ...

Bolero crash kills worker | बोलेरोच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

बोलेरोच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

Next

--------------------------

सिन्नरला ६३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण

सिन्नर : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये २८ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. आरक्षण सोडतीसाठी प्रवर्गनिहाय सरपंचपदांची संख्या निश्चित केली असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. ११४पैकी ६३ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ७, अनुसूचित जमातीसाठी १४ तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३० गावांची निश्चिती करण्यात आली आहे.

----------------------------

ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. वर्षा लहाडे

सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. वर्षा लहाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. माजी नगरसेवक हर्षद देशमुख, दापूर ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश आव्हाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपजिल्हा रुग्णलयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर चांगले उपचार करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी डॉ. लहाडे यांनी दिली.

--------------

शेतकरी-कामगार संघर्ष जत्थ्याचे स्वागत

सिन्नर : शेतकरी - कामगार संघर्ष जनजागृती जत्था (रथ) सिन्नरमध्ये आल्यानंतर आडवा फाटा येथे छत्रपती संभाजी महाराज चौक, आडवा फाटा येथे त्याचे स्वागत करण्यात आले. शहरासह बाजार समिती, मुसळगाव, माळेगाव एमआयडीसी तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये हा रथ नेण्यात आला. यावेळी मुकुंद रानडे, हरिभाऊ तांबे, प्रा. आर. के. मुंगसे, मोहन उगले, दत्तात्रय रसाळ, रणधीर सिन्हा, निवृत्ती केदार यांच्यासह कामगार व नागरिक उपस्थित होते.

---------------

पाताळेश्वर विद्यालयाला पुस्तके भेट

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाला जयहिंद लोकचळवळीचे समन्वयक जयराम शिंदे यांच्याकडून १६५ पुस्तके भेट देण्यात आली. तरुणांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी सुसंग्राह्य रचनात्मक पुस्तके, तरुणांची व समाजाची चांगली जडणघडण होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुस्तके विद्यालयाला भेट देण्यात आली. यावेळी शिंदे यांनी जयहिंद लोकचळवळीचा हेतू व उद्देश सांगितला.

Web Title: Bolero crash kills worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.