सोयाबीनपाठोपाठ आता कोबीचेही बोगस बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:20 IST2020-07-13T22:08:54+5:302020-07-14T02:20:34+5:30
नाशिक : सोयाबीननंतर आता कोबीच्या बियाणाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांनी लावलेले कोबीचे बियाणे उगवले नसल्याचे समोर आले आहे.

सोयाबीनपाठोपाठ आता कोबीचेही बोगस बियाणे
नाशिक : सोयाबीननंतर आता कोबीच्या बियाणाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांनी लावलेले कोबीचे बियाणे उगवले नसल्याचे समोर आले आहे.
या शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याबाबत कृषी विभागाने पंचनामे केले असून, कंपनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बागलाण तालुक्यातील किकवारी, तळवाडे दिगर, पारनेर आदी गावांमध्ये शेतकºयांनी कोबी बियाणाची लागवड केली होती; मात्र लावणी करून १० ते १५ दिवस झाले तरी बियाणे उगवलेच नाही.
याबाबत शेतकºयांनी कंपनीच्या प्रतिनिधीकडे तक्रार केली. त्याचबरोबर कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी विभागाने पंचनामे केले आहे. बियाणांबाबत अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकाºयांनी दिले आहे.
दरम्यान, कंपनीने बियाणे बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे.
मात्र शेतकºयांच्या झालेल्या खर्चाचे काय, असा प्रश्न किकवारी येथील गणेश काकुळते यांनी उपस्थित
केला आहे.
---------------------
बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात कोबीसह इतर भाजीपाला पिके घेतली जातात. गुजरातजवळ असल्याने माल थेट अहमदाबाद, सुरत येथील बाजारात पाठविला जातो. यामुळे शेतकºयांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. यावर्षी मात्र कोबीच्या बियाणाने शेतकºयांना दगा दिल्याने नाराजी व्यक्त होत असून, संबंधित कंपनीवर करवाई करण्याची मागणी होत आहे.