बोगस सोयाबीन बियाणे; २५ कंपन्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:19 IST2020-07-14T20:04:30+5:302020-07-15T01:19:35+5:30
निफाड : राज्यात बोगस सोयाबीनच्या बियाणांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित २५ कंपन्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. येथील पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत भुसे बोलत होते.

बोगस सोयाबीन बियाणे; २५ कंपन्यांवर गुन्हे दाखल
निफाड : राज्यात बोगस सोयाबीनच्या बियाणांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित २५ कंपन्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. येथील पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत भुसे बोलत होते. व्यासपीठावर आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार अनिल कदम, प्रांत अर्चना पठारे उपस्थित होत्या. राज्य सरकार बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांना सबसिडी देऊन आर्थिक पाठबळ देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी गट व फार्मर प्रोडिंसिंग कंपनी अशा नव्या पद्धतीने शेती व्यवसाय करून समृद्ध व्हावे, असे आवाहन भुसे यांनी केले. शेतकºयांच्या कर्जाबाबत तक्रारी आहेत. बैठकीला विविध खात्यांचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
---------------------
निफाड तालुक्यात शेतकºयांना राष्ट्रीयीकृत बँकांनी २५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना फक्त ११३ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपात बँका जर नियम दाखवून हात आखडता घेत असतील तर प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचा इशारा भुसे यांनी यावेळी दिला. पाऊस वेळेवर झाल्याने निफाड तालुक्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, हंगामासाठी बँका कर्ज वितरण करताना शेतकºयांना त्रास देत असल्याच्या तक्रारी असल्याचे भुसे म्हणाले.