शेततळ्यामध्ये युवतीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:25 IST2020-08-10T21:45:25+5:302020-08-11T01:25:48+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील शिवलाल भीमाजी इंगळे यांच्या मालकीचे शेतजमीन गट नंबर २७२ मधील शेततळ्यामध्ये सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कुमारी जयश्री शिवाजी आजगे (१९, रा. वळदगाव, ता. येवला) या युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

शेततळ्यामध्ये युवतीचा मृतदेह
ठळक मुद्देघटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
लासलगाव : निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील शिवलाल भीमाजी इंगळे यांच्या मालकीचे शेतजमीन गट नंबर २७२ मधील शेततळ्यामध्ये सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कुमारी जयश्री शिवाजी आजगे (१९, रा. वळदगाव, ता. येवला) या युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. याबाबत गोंदेगावचे पोलीसपाटील संतोष माधव सोमासे यांनी लासलगाव पोलिसांना घटनेची माहिती देताच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व राजेंद्र पानसरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.