आडगावला अज्ञात वाहनाच्या धडकेने इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 14:50 IST2017-08-04T14:50:06+5:302017-08-04T14:50:13+5:30

The body of an unknown vehicle in Adgaon was killed | आडगावला अज्ञात वाहनाच्या धडकेने इसम ठार

आडगावला अज्ञात वाहनाच्या धडकेने इसम ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक: आडगाव शिवारातील गुरुनानक पेट्रोलपंपासमोरील रस्त्याने जाणाºया इसमाला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारातील शरद संपत साळवे (३७) हे ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, आडगाव शिवारातील गुरुनानक पेट्रोलपंपाजवळील रामनाथनगर येथे राहणारे साळवे हे गुरुवार (दि. ३) सायंकाळी साडेसात वाजता गुरूनानक पेट्रोलपंपासमोरील रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली, या धडकेत साळवे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The body of an unknown vehicle in Adgaon was killed