गोंदे दुमाला परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:52+5:302021-08-20T04:19:52+5:30
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (दि. १९) सकाळी ७:४५ वाजता भगर मिलच्या ...

गोंदे दुमाला परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (दि. १९) सकाळी ७:४५ वाजता भगर मिलच्या मागच्या बाजूस एक अनोळखी महिलेचे प्रेत पडले असल्याबाबत गोंदे दुमालाचे पोलीस पाटील कमलाकर भिकाजी नाठे यांनी पोलिसांना कळविले. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवीदास फड आदींनी घटनास्थळी भेट देत त्याची नोंद घेतली. सदर अनोळखी महिलेचे वय अंदाजे ५५ वर्ष असून शरीराने सडपातळ आहे. उंची ५ फूट ४ इंच व रंगाने सावळी, अंगात हिरव्या रंगाचा टॉप, निळ्या रंगाचा परकर, नाक सरळ, ब्लँकेट गुंडाळलेली आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन वाडीवऱ्हे पोलिसांनी केले आहे.