पाटात वाहून गेलेल्या खेलूकरचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: May 10, 2014 23:51 IST2014-05-10T22:08:04+5:302014-05-10T23:51:54+5:30
पंचवटी : विडी कामगारनगरजवळील पाटात बुडालेल्या योगेश माहुरेचा मृतदेह शुक्रवारी सापडल्यानंतर शनिवारी प्रणव खेलूकर या मुलाचाही मृतदेह आडगाव शिवारात सापडला़ गेल्या चार दिवसांपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते़

पाटात वाहून गेलेल्या खेलूकरचा मृतदेह सापडला
पंचवटी : विडी कामगारनगरजवळील पाटात बुडालेल्या योगेश माहुरेचा मृतदेह शुक्रवारी सापडल्यानंतर शनिवारी प्रणव खेलूकर या मुलाचाही मृतदेह आडगाव शिवारात सापडला़ गेल्या चार दिवसांपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते़
बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विडी कामगारनगरमध्ये राहणारे प्रणव मधुकर खेलूकर (८) आणि योगेश बाळकृष्ण माहुरे (११) हे आंघोळीसाठी गेले असता पाण्यात वाहून गेले़बराच वेळ होऊनही मुले घरी न परतल्याने पालकांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली होती़ अग्निशमन विभाग तसेच पोलीस यंत्रणेकडून गेल्या चार दिवसांपासून या मुलांचा शोध सुरू होता़ त्यापैकी योगेश बाळकृष्ण माहुरे (११) या मुलाचा मृतदेह लाखलगाव शिवारातील उखाडे यांच्या शेताजवळ पाटात शुक्रवारी आढळून आला, तर प्रणव खेलूकरचा मृतदेह शनिवारी आडगाव शिवारात पोलीसपाटील एकनाथ मते यांच्या घराजवळील पाटात आढळून आला़ (वार्ताहर)
फ ोटो :- ०७ पीएचएमए ११५
मयत प्रणव खेलूकर