शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केळझर धरणाच्या काठावर सापडला युवतीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:00 IST

केळझर (गोपाळसागर) धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह संपूर्ण कुजून केवळ सांगाडा शिल्लक राहिल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

डांगसौदाणे : केळझर (गोपाळसागर) धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह संपूर्ण कुजून केवळ सांगाडा शिल्लक राहिल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही.केळझर धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढल्यानंतर येथील पोलीसपाटील जगन देशमुख यांनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सटाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार के. टी. खैरनार, नाईक पंकज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करताना अंगात गाऊन, परकर असे स्त्रीचे कपडे, पायात पैंजण आढळल्याने हा युवतीचा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. अंदाजे दोन महिन्यांचा कालावधी उलटल्याने मृतदेह कुजल्याने फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची नोंद केली आहे.शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरणात असून, ही हत्या की आत्महत्या याची चर्चा सुरू आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार खैरनार, नाईक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबननाशिक : दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडलेले सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सेवेतून निलंबित केले आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सटाणा पोलीस ठाण्यात सापळा रचून सूर्यवंशी यास शुक्रवारी (दि़१४) रंगेहाथ पकडले होते़ सटाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मित्राविरोधात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास केशव सूर्यवंशी यांच्याकडे होता़ त्यांनी यापूर्वीच संबंधित संशयितास अटकही केली होती़ त्यानंतर आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती़ सटाणा पोलीस ठाण्यात सूर्यवंशीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन अटक होताच दराडे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत़रस्त्यावर उभी केलेली मोटारसायकल लंपासओझर टाउनशिप : सर्व्हिस रोडलगत उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मंगळवारी सायंकाळी पावणेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खंडेराव कुंडलिक सदगीर, रा. संभाजीनगर ओझर यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १५ ईएम ३२५४) सर्व्हिस रोडवर असलेल्या शिवले कॉम्प्लेक्स समोर उभी करून ते भाजी बाजारात गेले होते.बाजारातून परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नव्हती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण मोटारसायकल मिळून आली नाही. त्यांनी शनिवारी मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्र ार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या आदेशात निलंबन काळात सूर्यवंशी यांना ग्रामीण पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांकडे दिवसातून दोन वेळा हजेरी तसेच लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे म्हटले आहे़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी