वैतागवाडीत आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 01:18 IST2021-04-19T01:17:57+5:302021-04-19T01:18:51+5:30
मालेगाव शहरातील वैतागवाडी परिसरातील भिल्ल वस्तीत बारा वाजेच्या सुमारास नदीकाठावर एक इसम मृतावस्थेत मिळून आला. तेथील लोकांनी रमजानपुरा पोलिसांना कळविले.

वैतागवाडीत आढळला मृतदेह
मालेगाव : शहरातील वैतागवाडी परिसरातील भिल्ल वस्तीत बारा वाजेच्या सुमारास नदीकाठावर एक इसम मृतावस्थेत मिळून आला. तेथील लोकांनी रमजानपुरा पोलिसांना कळविले.
पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु हा भाग वडनेर खाकुर्डी पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने वडनेर पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान मृताच्या खिशात काही कागदपत्र मिळून आल्याने तो कमालपुरा भागातील असल्याचे समजले.