गंगापूर धरण परिसरात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:44 IST2020-10-10T22:01:58+5:302020-10-11T00:44:06+5:30
नाशिक गोवर्धन परिसरातील गंगापूर धरणाच्या लगत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा गळा दाबून खून करत मारेकऱ्यांनी मृतदेह बेवारसपणे टाकून पोबारा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आतपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

गंगापूर धरण परिसरात आढळला मृतदेह
नाशिक गोवर्धन परिसरातील गंगापूर धरणाच्या लगत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा गळा दाबून खून करत मारेकऱ्यांनी मृतदेह बेवारसपणे टाकून पोबारा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आतपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात शुक्र वारी (दि.९) सकाळी एका २५ ते ३० वयोगटातील एका तरु णाचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळतात तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेहाची ओळख पाठविण्याचा प्रयत्न केला; मात्र ओळख पटू शकली नाही. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आला. अलीकडे गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा परिसर असो की, कश्यपी, गौतमी-गोदावरी धरणाचा परिसर, हा भाग मद्यपी टोळ्यांच्या ओल्या पार्ट्यांचे केंद्र बनले आहे. या मृतदेहाजवळ दारूची रिकामी बाटली पोलिसांना आढळून आली आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत..