रासेगाव तलावात आढळला मुलाचा मृतदेह

By Admin | Updated: September 3, 2014 00:35 IST2014-09-03T00:35:27+5:302014-09-03T00:35:27+5:30

रासेगाव तलावात आढळला मुलाचा मृतदेह

The body of the boy found in Rasegaon lake | रासेगाव तलावात आढळला मुलाचा मृतदेह

रासेगाव तलावात आढळला मुलाचा मृतदेह


दिंडोरी : जांबूटके येथील कौटुंबिक वादाने घरातून पिता-पुत्र व दोन मुलीं निघून गेल्या त्यापैकी मुलाचा मृतदेह रासेगाव शिवारातील तलावात सापडल्याने खळबळ उडाली. सदर आत्महत्त्या की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे, तर इतर तीन जण अद्याप बेपत्ता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. येथील दिनकर भगवंत अपसुंदे (४०) यांचे तीन दिवसांपूर्वी पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाले होते. यानंतर अपसुंदे हे मुलगा योगेश ( १३) , मुलगी वैशाली (१५) , जिजा (७) यांच्यासह नवीन महिंद्रा मॅक्झिमो या गाडीत घरातून निघून गेला होते.



दरम्यान आज दुपारी योगेश याचा मृतदेह नासिक पेठ रस्त्यानजीक रासेगाव शिवारातील एका तलावात आढळल्याने एकच खळबळ उडाली . घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला . तलावाच्या कडेला दिनकर अपसुंदे यांचे पन कार्ड सापडल्याने इतर तिघेही तलावात असल्याचे संशयाने पोलिसांनी तत्काळ नाशिकला अिग्नशमन दलाला पाचारण केले . या पथकाने रात्री उशिरापर्यंत संपूर्ण तलावात शोध घेतला मात्र काहीही आढळले नाही . दरम्यान तपासात दिनकर यांचे त्याचे पत्नीशी काल संभाषण होवून तो मुलांना घेवून आळंदी येथे जात असल्याचे सांगितल्याची बाब समोर आली असून त्याचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांचा तपास लागलेला नाही पोलीस त्यांचा शोध घेत आहे . दरम्यान योगेश ने आत्महत्या केली कि त्याचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय शुक्ला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख , हवालदार बोरसे,पाटील आदि तपास करत आहे

Web Title: The body of the boy found in Rasegaon lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.