दोन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:17 IST2021-10-30T01:16:58+5:302021-10-30T01:17:49+5:30

मालेगाव तालुक्यातील झोडगे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

The bodies of two unidentified Ismas were found | दोन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळले

दोन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळले

मालेगाव : तालुक्यातील झोडगे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ३५ वर्षे, रंगाने सावळा, शरीराने सडपातळ, उंची १६५ से.मी., चेहरा उभट, डोक्यास काळे केस, दाढी वाढलेली, अंगात राखाडी जॉकेट, मेहंदी व पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची बरमुडा पॅन्ट अशा वर्णनाचा अनोळखी इसम अर्जुन संजय देवरे यांच्या शेतात बाभळीच्या झाडाखाली मयत अवस्थेत मिळून आला आहे.

            दुसरी घटना झोडगे येथील जनता विद्यालयाच्या मैदानासमोरील ठाकूरसिंग बाबा यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ५० वर्षे, रंगाने सावळा, शरीराने सडपातळ, उंची १६५ से.मी. चेहरा उभट, पांढऱ्या रंगाची, अंगात पांढरा व भगवा पट्टा असलेला टी-शर्ट, भुरकट रंगाची पॅन्ट, अशा वर्णनाचा अनोळखी इसम मयत स्थितीत आढळून आला आहे. दोन्ही अनोळखी मयत इसमाबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास दुमने यांनी केले आहे.

Web Title: The bodies of two unidentified Ismas were found