बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

By Admin | Updated: August 13, 2014 00:42 IST2014-08-13T00:25:12+5:302014-08-13T00:42:03+5:30

बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

The bodies of the missing people were found | बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

नाशिकरोड : आढाव मळ्याजवळ रविवारी सायंकाळी गोदावरी नदीपात्रात बुडालेले वसतिगृहाचे व्यवस्थापक व विद्यार्थ्याचा मृतदेह आज मिळून आला.
आगरटाकळी रोडवर गुड शेफर्ड होम हे वसतिगृह आहे. रविवारी सायंकाळी व्यवस्थापक मुकेश अंबादास हिवराळे व वसतिगृहातील १५ विद्यार्थी आढाव मळ्याजवळ गोदावरी नदीकिनारी फिरण्यास गेले होते. यावेळी आकाश अशोक गायकवाड या विद्यार्थ्याचा पाय घसरल्याने तो नदीत पडून गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी व्यवस्थापक मुकेश हिवराळे याने नदीपात्रात उडी मारली. मात्र जोरदार वाहत्या पाण्याच्या प्रवाहात ते दोघे पाण्यात बुडून दिसेनासे झाले.
त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीपात्रात गळ टाकून रविवारी व सोमवारी दिवसभर बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठेही मिळून आले नाही. मात्र आज सकाळी १० वाजता जेलरोड संत जनार्दनस्वामी पुलाजवळ पाण्यावर तरंगत असलेला हिवराळे यांचा मृतदेह मिळून आला, तर दुपारी दोन वाजेच्या सुमारास आढाव मळ्याजवळ ज्या ठिकाणी ते दोघे बुडाले होते त्याच्यापासून काही फूट अंतरावरच विद्यार्थी आकाश गायकवाड याचा मृतदेह नदीपात्राच्या किनारी असलेल्या झाडाच्या मुळाशी अडकलेला मिळून आला. (प्रतिनिधी)

Web Title: The bodies of the missing people were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.