ओझरखेड शिवारात आढळला मृतदेह
By Admin | Updated: July 4, 2017 23:44 IST2017-07-04T22:52:26+5:302017-07-04T23:44:00+5:30
वणी : वणी-दिंडोरी रस्त्यावर पाण्याच्या टाकीत एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती गंगाधर निखाडे यांनी दिली.

ओझरखेड शिवारात आढळला मृतदेह
वणी : वणी-दिंडोरी रस्त्यावर हॉटेल श्रीहरीच्या बाजूला पडीत शेतजमिनील पाण्याच्या टाकीत एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती गंगाधर निखाडे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रु ग्णालयात दाखल केला. सदर इसम ५ फूट उंच, शरीराने काळा-सावळा, अंगात सफेद रंगाचा शर्ट, चॉकलेटी पॅन्ट, उजव्या हातावर गोंदलेले असा वर्णनाचा आहे. त्याचे शव विच्छेदन केले असता आजाराने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश बागुल यांनी काढला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.